वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन

कोरोनाच्या पहिल्या लाटेबरोबरच दुससऱ्या लाटेतही आमदार मा. निलेश लंके यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून 1100 बेडचे मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोवीड सेंटर उभारले. सदर कोवीड सेंटर हे जिल्ह्यासह राज्यातील रूग्णांचा एक आधार बनले. महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यातील ही काही रूग्णांनी कोवीड सेंटर मध्ये उपचार घेतले. दुसऱ्या लाटेत सुरू केलेले हे कोवीड सेंटर राज्यासह देशभर चर्चेचा विषय झाला होता. कोवीड सेंटरचे नियोजन, रूग्णांची व्यवस्था, भोजन व्यवस्था, मनोर्धेर्य वाढविण्यासाठी आयोजित केलेले सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, अनेक महत्वाचे मान्यवर व लोकांनी दिलेल्या भेटी व अभिप्राय, कोवीड सेंटरला देश-विदेशातुन केलेली मदत यामुळे तालुक्याचे आमदार व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्य जगभर पोहचले. हजारो रूग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले.

त्यांच्या या कार्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेऊन त्यांच्या नावाचा सामावेश ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’ मध्ये केला. नुकताच मुंबई येथे आमदार निलेश लंके यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

“हा सन्मान माझा नव्हे तर माझ्या मतदार संघातील सर्व माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या मायबाप जनतेचा, पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान आहे.” –
मा. आ. निलेश लंके

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.