ध्येय व उद्दिष्टे

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर देशामध्ये काळानुरूप अनेक बदल होत गेले. वेगवेगळ्या विषयात भारताने आपले वेगळेपण व अस्तित्व सिद्ध केले. बदलत्या काळानुरूप लोकांच्या गरजा ही बदलत गेल्या. बदलत्या गरजा पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या. परंतु अजूनही देशातील काही ठिकाणी शिक्षण व आरोग्य या दोन गोष्टी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत किंवा त्यांच्याकडे द्यायला पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे देशात आजही अनेक गरीब, गरजु, अनाथ, कामगार व असंघटित लोकांना शिक्षण व आरोग्य या दोन गोष्टींसाठी झगडावे लागत आहे. ग्रामिण भागात शिक्षण, आरोग्य याबरोबरच रोजगार, तंत्रज्ञान, पर्यावरण विकास, क्रिडा, कृषीविकास, महिला व बालविकास, महिला सक्ष्मीकरण, दिव्यांग विकास, सांस्कृतिक विकास या गोष्टींवरही ग्रामिण भागात जास्त देण्याची आवश्यकत आहे. यासाठी राज्यसह देशातील अनेक संस्थांनी या विषयावर काम करण्यासाठी पुढे आल्या. त्यातीलच एक संस्था ‘निलेश लंके प्रतिष्ठान’ होय.

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका तसा दुष्काळी व पठारी भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे व आदर्श गाव चे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे तालुक्याची ओळख देशपातळीवर गेली. त्यानंतर पारनेर चे नाव, पारनेर चे आमदार लोकनेते श्री. निलेश लंके यांची कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोवीड सेंटरमुळे देशपातळीवर गेले. दुष्काळी भाग असल्याने तालुक्यातील बरेचसे लोक नोकरी, व्यवसाय व कामधंद्यानिमित्त राज्यातील विविध भागात वास्तव्यास आहेत.

आधुनिकतेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उच्च व दर्जेदार शिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. परंतु आपल्या कौटूंबिक , आर्थिक परिस्थितीमुळे व गरीबीमुळे ज्या हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचण येत आहे अशा विद्यार्थ्यांना संस्था आर्थिक व वस्तु स्वरूपात मदत करते.

बदलती जीवनशैली व राहणीमान यामुळे मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. आधुनिक उपचार हे गरीब व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरचे झाले आहे. त्यामुळे अनेक रूग्णांना वेळेवर उपचार घेणे शक्य होत नाही. परिणामी काहींना आपला जीव गमवावा लागतो. उपचार घेण्यासाठी अनेक कुटूंब कर्जबाजारी झाल्याचे उदाहरणे आपल्या समोर आहेत. कर्जबाजारीपणामुळे कुटूबांतील इतर मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतात. परिणामी कौटूबिक ताणतणाव वाढत आहेत. यासर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने शिक्षण व आरोग्य या दोन गोष्टींना अधिक प्राधान्य देण्याचा ठरविले आहे. संस्था शिक्षण व आरोग्याबरोबरच महिला सक्षमीकरण, पर्यावरण विकास, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, दिव्यांग विकास, कृषी विकास व क्रिडा यावरही काम करत आहे.

कोरोना आपत्ती काळात भासलेली वैद्यकिय गरज लक्षात घेऊन गरीब जनतेसाठी पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रूक येथे 200 बेडचे मल्टी-स्पेशालिटी व चाईल्ड केअर हॉस्पीटल उभारण्याचे ध्येय आहे. या हॉस्पीटलमध्ये रूग्णांना सर्व सुविधा मोफत देण्याचा मानस आहे. लवकरच सर्व जनतेसाठी हे हॉस्पीटल खुले होणार आहे.

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.