स्वयंसेवी संघटना समाजाचा अविभाज्य घटक आहे. समाजाच्या विकासामध्ये त्या महत्वाची भूमिका बजावतात. शासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या व गरज असलेल्या गरजुंना विशेष करून मदत करण्याचा मानस आहे. यामध्ये आर्थिक दृष्ठ्या दुर्बल असणाऱ्या सर्व समाज घटकातील लोकांसाठी त्यांच्या आवश्यकता व गरजेनुसार योग्य ती चौकशी केल्यानंतर अशा लोकांसाठी विविध प्रकारे मदत संस्थेकडून केली जाणार आहे. यामध्ये सदर व्यक्ती जर एखाद्या शासकिय योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असेल तर सर्वप्रथम त्यासाठी पाठपुरावा करून त्यास संबंधित मदत मिळून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच शासनाकडून दुर्लक्षीत राहिलेल्या गरजवंतांसाठी विविधी प्रकारे संस्थेकडून मदत केली जाईल. यामध्ये महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीन वाटप, झेरॉक्स मशीन वाटप, ई-रिक्षा वाटप, विद्यार्थ्यांसाठी सायकल चे वाटप, लोक कलावंतांसाठी वाद्य, अपंगासाठी ट्रायसायकलचे वाटप, खेळाचे साहित्य, कृषी साहित्य इ.