पार्श्वभूमी
काळानुरूप बदले राहणीन, खाण-पान, बदललेली जीवनशैली व व्यसनाधिनता यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी कुणीही फारसे कष्ट किंवा विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत त्यामुळे लोकांना गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. तरूणांमधील व्यसनाधिनता चिंतेची बाब आहे. आरोग्य समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपचार घेणे सामान्य व गरीब लोकांच्या आवाक्याबाहेरील झाले आहे.
2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे आरोग्य सुविधेचे खरे वास्तव्य समोर आले आहे. यामुळे संस्थेच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने पारनेर तालुक्यामध्ये एक हॉस्पीटल उभे करण्याचे ठरविले आहे. सदर हॉस्पीटल मध्ये मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याचबरोबर संस्थेकडून काही रूग्णांस वैद्यकिय मदत ही देण्यात येते.
उद्देश
गोरंगरीब जनतेचा खुप मोठ्या प्रमाणावर पैसा हा स्वतःच्या आरोग्यावर खर्च होतो. कुटूंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारामुळे संपुर्ण कुटूंब प्रभावीत होते. काही कुटूंब उपचार घेण्यासाठी कर्जबाजारी होतात. काहींना आपल्या जमीनी विकाव्या लागतात. तर काही उपचाराअभावी मृत्यु पावतात. गरीब, गरजु, आर्थिक दृष्ठ्या दुर्बल व मागास, अनाथ, भूमिहीन, आदिवाशी व आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांसाठी वैद्यकिय मदत मिळावी, त्यांचा थोडा आर्थिक भार कमी व्हावा या उद्देशाने संस्थेकडून वैद्यकिय आर्थिक मदत दिली जाते.
निकष व पात्रता
- रूग्णाच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
- महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना/ आयुष्यमान भारत योजना/ राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मादाय हॉस्पीटल इत्यादी शासकिय योजनेमधून रूग्णाचे उपचार होत असतील तर सर्व प्रथम त्यास संस्थेकडून प्राधान्य दिले जाईल. अशा रूग्णास सदर योजनेतून उपचार मिळण्यास संस्थेकडून सर्व सहकार्य केले जाईल.
- विविध शासकिय योजनातून रूग्णाचे उपचार होत असतील तर त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. अशा रूग्णास प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणार नाही.
- एखाद्या लाभार्थी रूग्णांस संस्थेने मदत केल्यास सदर रूग्णास पुढील 5 वर्षापर्यंत संस्थेकडून आर्थिक मदत मिळणार नाही. परंतु अशा सर्व रूग्णांना शासकिय योजनेतून उपचार मिळवून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील.
- पात्र रूग्णास/नातेवाईकास सर्व कागदपत्रांची पुर्तता करणे बंधनकारक राहील.
- हॉस्पीटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर वैद्यकिय मदत मिळणार नाही.
- मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री सहायता निधी, रूग्ण सहाय्य समिती, विविध शासकिय वैद्यकिय योजना/ वैद्यकिय मदत निधी/धर्मादाय रूग्णालय यांना/ वैद्यकिय मदत करणाऱ्या धर्मादाय संस्था यांना रूग्णाच्या कागदपत्रांची खात्री करून आमदार मा. निलेश लंके यांचे शिफारस/परिचय पत्र संस्थेकडून देण्यात येईल.
- एखाद्या गरीब, गरजु, कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचे वैद्यकिय कारणारे उपचारा दरम्यान निधन झाल्यास, सदर व्यक्तीच्या उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च झाला असल्यास अशा कुटूंबास संस्थेकडून काही रक्कम मदत म्हणून दिली जाईल.
- लहान मुलांवरील अतिमहत्वाच्या व मोठ्या शस्त्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न व आर्थिक सहायता संबंधी अधिक आर्थिक मदतीसाठी संस्थेच्या मिटींगमध्ये चर्चा करून अधिक आर्थिक मदत घेणे बाबत निर्णय घेण्यात येईल.