आपण खालीलप्रमाणे वस्तु/शालेय साहित्य भेट देऊन सहयोग करू शकता.
शालेय साहित्य
वह्या-पुस्तके, शाळेचे गणवेश, दप्तर, बुट-चप्पल, रेनकोट, छत्र्या, पेन-पेन्सिल, कंपास बॉक्स, अंकलिपी, नकाशे इत्यादींसह आर्ट, कॉमर्स, सायन्स, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी लागणारे साहित्य.
शैक्षणिक साहित्य
सायकल, मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणक
वस्तु
अन्नधान्य, किराणा
शैक्षणिक पालकत्व
आपण अनाथ, गरीब, गरजु व अदिवाशी मुलांचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेऊ शकता.
वरील वस्तु व साहित्या व्यतिरीक्त दैनंदिन जीवनात वापरासाठी लागणारे आवश्यक साधने, जीवनावश्यक वस्तु व आवश्यकता व गरजेनुसार संस्थेद्वारे उभे करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी लागणारी आवश्यक साधनसाम्रगी आपण वस्तु स्वरूपात भेट देऊन सहयोग करू शकता.