लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर अवार्ड – 2020

2020 मध्ये देशात कोरोना रोगाने थैमान घातले होते. संपुर्ण जगाला कोरोना रोगाने ग्रासले होते. जनता त्रस्त झाली होती. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे देशात अचानकपणे लॉकडाऊन लावले होते. अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच स्तरातील लोकांचे खुप हाल झाले. यामध्ये गरीब, कामगार, शेतकरी व मजुर वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. पारनेर तालुक्यातील सुपा, शिरूर, पुणे, चाकण क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असल्याने राज्यातील विविध भागातून व शेजारच्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यातून ही मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या औद्योगिक क्षेत्रात मजूर व कामगार म्हणून काम करीत आहे.

अचानक लागलेल्या लॉकडाऊन मुळे हे सर्व मजुर आपआपल्या गावी पायी निघाले होते. लॉकडाऊनमुळे घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. जेवण, पाणी व इतर वस्तु घेण्यासाठी कोणतेही दुकान उघडे नव्हते. अशा वेळा पारनेर-नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतला. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या अशा गरीब, मजदुर व कामगार वर्गातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून सर्वांनाच मदतीचा हात दिला. नगर-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी आनंदी थाळी नावाने अन्नछत्र उभारले. अनवाणी चालणाऱ्या अनेक मजूर व लहान मुलांना चप्पल व बुटांचे वाटप केले. परराज्यातील तसेच राज्यातील इतर लोकांना आपआपल्या गावी पोहच करण्यासाठी एसटी महामंडळच्या बस व खाजगी बसच्या व्यवस्था करून सर्वांना घरी पोहोच केले. अनेक गरीब कुटूंबांना घरपोहच किराणा मालाचे मोफत वाटप केले. अनेक मजुरांची राहण्याची व्यवस्था केली. तसेच रूग्णांसाठी मा. शरदचंद्र पवार कोवीड सेंटर उभारले.

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.