शैक्षणिक मदत

पार्श्वभूमी

शिक्षण हा व्यक्ती विकासाचा पाया आहे. पारनेर हा दुष्काळी व पठारी भाग असल्याने उत्पन्नाचे कोणतेही आर्थिक साधन नसल्याने योग्य ते उच्च व दर्जेदार शिक्षण घेऊन तालुक्याच्या बाहेर जावून मिळेल ती नोकरी व कामधंदा करणारे अनेक लोक तालुक्याबाहेर आहेत. अनेक मुले हे योग्य मार्गदर्शन व परिस्थितीमुळे गुणवत्ता व ज्ञान असूनही पैशां अभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. तसेच घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्याच्या वयात कुटूंबाला व शेतीच्या कामात आर्थिक हातभार लावताना दिसतात. गुणवंत व हुशार असूनही मार्गदर्शन व आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेता येणाऱ्या होतकरू मुलांसाठी संस्थने कार्य करण्याचे ठरविले आहे.

उद्देश

तालुका व जिल्ह्यासह राज्यातील सर्व जाती-धर्मातील गरीब, गरजु, आर्थिक दृष्ठ्या मागास, दारीद्रयरेषेखालील, आदिवाशी, भूमिहीन, दिव्यांग, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं जी गुणवंत व हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक साहित्य व वस्तु स्वरूपात मदत करण्याचा संस्थेचा उद्देश आहे. गेल्या 10 वर्षांपासून संस्था अशा विद्यार्थ्यांना मदत करत आहे. त्याची व्याप्ती वाढून अधिकाधीक होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

निकष व पात्रता
 1. सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
 2. तहसिलदार उत्पन्नाचा दाखला (५० हजार पेक्षा जास्त नसावा.)
 3. विद्यार्थी भूमिहीन असेल तर भूमिहीन असल्याचा दाखला.
आवश्यक कागदपत्रे
 1. विहीत नमुन्यातील अर्ज
 2. शाळा/कॉलेज बोनाफाईड (15 दिवसाच्या आतील)
 3. आधार कार्ड
 4. रेशन कार्ड
 5. भूमिहीन असल्यास दाखला
 6. अनाथ असल्यास आई-वडीलांच्या मृत्युचा दाखला
 7. दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला
 8. आदिवाशी असल्यास आदिवाशी असल्याचा दाखला
 9. शाळा/कॉलेजचे पत्र

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.