5 ऑगस्ट 2019 रोजी मा. अजितदादा पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रेस सुरूवात केली. प्रत्येक गावागावात जावून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. 24 ऑक्टोबर 2019 रोजी 61 हजार मताधिक्क्याने निवडून येऊन एका सामान्य गरीब कुटूंबातील शिक्षकाचा कामगार मुलगा आमदार झाला. त्यांच्या या विक्रमी विजयाने तालुक्यातील अनेक प्रस्थापीतांची एक फळी गारद झाली व पारनेर सह नगर तालुक्यातील जनता ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली.
राज्यात महाआघाडीचे सरकार आले कारणाने एक सामान्य कुटुंबातील आमदार सत्तेतील आमदार झाले योगायोग असा की 145 मॅजिक फिगर चे मतदान निलेश लंके यांच्या मताने झाले व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी,ज्या पक्षातून आमदार निलेश लंके यांची हाकलपट्टी केली त्या मा.शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या मताने उद्धव साहेब ठाकरे हे महाआघाडीचे मुख्यमंत्री झाले.
हजारोंचा जनसमुदाय जमलेल्या विजयी सभेमध्ये हा सामान्य घरातील आमदार भावनिक झाला व येथे जन्मलेला प्रत्येक माणूस आमदार आहे असा मनाचा मोठेपणा दाखवत साधेपणाची साद दिली व पिढीजात चालत आलेल्या घराणेशाहीला खिळ घालत तसेच तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण गढून झाला असतानाही सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्यातील विधानसभेत पोहोचत मतदारसंघाचे नेतृत्व करू शकते हे सिद्ध केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पारनेर तालुक्यातील या हिऱ्याला ओळखुन विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली त्या संधीचे लोकनेते निलेश लंके यांची सोनं केले.
आमदार झाल्यानंतर आपल्या कार्याचा झंझावात चालू ठेवत महाराष्ट्रात कुणीही नाही केले असे या लोकप्रिय कार्यकुशल आमदार लंके यांनी चालू केले.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी पारनेर येथे जनता दरबार व मंगळवारी नगर येथे जनता दरबार घेत सर्वसामान्य माणसांच्या प्रशासकीय पातळीवर होणारी अडवणूक व त्यांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी सर्व अधिकारी वर्गाला एकत्र बोलवत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक सुरू केली व हजारो प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. जनता दरबार ही नवीन संकल्पना त्यांनी पारनेर-नगर मतदार संघात उदयास आणली.
नोव्हेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील अनेक गावांमध्ये शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे शासकीय पंचनामे करण्यासाठी सर्व अधिकारी यंत्रणा बरोबर घेत गावोगावी जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
प्रथमच विधानसभेत गेलेले आमदार निलेश लंके यांना विधिमंडळाची कुठलीही माहिती नसताना पहिल्यास हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वातून महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक मुद्दे तारांकित करत मतदार संघातील विविध प्रलंबित विषयाला हात घातला. व महाराष्ट्राच्या विधानसभेत एक साधेपणाचे आमदार हे वेगळेपण महाराष्ट्राला दाखवून दिले .
अधिवेशनाच्या काळात मुंबईमध्ये तळ ठोकून अनेक मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेत आपला दुष्काळी मतदार संघात नाविन्यपूर्ण योजना कशा राबवता येतील याचा अभ्यास करत पाठपुरावा केला.त्यात टाकळीढोकेश्वर येथील पोलीस स्टेशन असो,प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न असो, ढवळपुरी येथील एम.आय.डी.सी. असो पाणी प्रश्न असो,रोहित्राची कमतरता व वीज वितरण कंपनीच्या अनेक समस्या असो,बाभुळवाडे सबस्टेशन असो,पारनेर शहराचा नागरी विकास असो, याप्रमाणे अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कागदपत्रांचा पाठपुरावा करत आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण दाखवून दिले. सामान्य नागरीकांमध्ये लगेच व सहज मिसळण्यांची त्यांची शैली त्यांना इतर राजकारणी व पुढाऱ्यांपेक्षा वेगळी ठेवते. त्यांच्या या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते त्यांना जोडत गेले. जनतेप्रती त्यांच्या आपुलकीमुळे जनतेमध्ये त्यांच्याप्रती जिव्हाळा निर्माण झाला. कार्यकर्त्यांत मिसळून ग्राउंड लेवलवर प्रत्यक्ष काम ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. यामुळे ते सर्व सामान्य वाटतात. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदार संघासह राज्यात त्यांनी तरूणांचे एक संघटन उभे केले व तरूणही प्रतिष्ठानच्या कार्यात उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. परंतु संघटनात्मक नेतृत्वाचा पगडा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून तो अविश्वासाचा ठराव बारगळला गेला.आमदार लंके यांचा राजकीय मुस्तद्दीपणा पुन्हा एकदा तालुक्याने पाहिला. तदनंतर झालेली पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीत विरोधक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी पाकीटमारी केल्यामुळे सभापतीपदी शिवसेनेचा उमेदवार आरुढ झाला परंतु उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ.सुनंदाताई सुरेश धुरपते यांची वर्णी लावण्यात आमदार लंके यशस्वी झाले.व त्यांच्या विकासात्मक राजकीय व सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला .
224 पारनेर नगर मतदार संघाची भूमि ही शुरांची, वीरांची, त्यागी समाज सुधारकांची, साधू संतांची भूमी या भूमीने देशाला अनेक नामवंत हिरे दिले आहे. बहिर्जी नाईक, सेनापती बापट, संत निळोबाराय महाराज तसेच या मतदार संघातील पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार हे या मतदार संघातील भूमिपुत्र व त्यांच्या कर्तृत्वाची ओळख सातासमुद्रा पलीकडे पोहोचवणारी पारनेर नगरची माती .
देशाचे राजकारण व समाजकारण करत देशाला नवी दिशा देणारे व तळागाळातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींची गुणवत्ता ओळखण्यात माहीर असणारे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या जवाहीराने निलेश लंके नावाचा मौल्यवान हिऱ्याची पारख करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून निलेश लंके यांच्यावर विश्वास टाकला व त्या विश्वासाच्या बळावर एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला पारनेर नगर मतदार संघाच्या आज वरील राजकीय इतिहासात सर्वाधिक 61 हजार मताधिक्क्याने जनतेने निवडून दिले व सर्वसामान्य जनतेच्या हृदयअसनावर जनतेने आपला जननायक म्हणून त्या सामान्य व्यक्तीला लोकनेता ही पदवी बहाल केली.