


आमच्या विषयी थोडक्यात
पारनेर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटूंबातील एका तरूणाने तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाहीला झुगारून तालुक्यात सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रणी भूमिका घेऊन सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांचे हे कार्य पाहून पारनेर तालुक्यातील विविध गावातून काही तरूण मंडळी एकत्र येऊन मा.श्री. निलेश लंके यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली निलेश लंके प्रतिष्ठानची सामाजिक कार्यासाठी स्थापना केली व निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामांना सुरूवात केली.
पारनेर सारख्या डोंगराळ, पठार व पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले तालुक्यातील जनतेचे प्रश्न व समस्या युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारनेर-नगर मतदार संघ व महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी विविध कार्यक्रम व उपाययोजना राबविणे. यामध्ये प्रामुख्याने कला, शिक्षण, आरोग्य, क्रिडा, कृषी व शेती विकास, दिव्यांग विकास, पर्यावरण विकास, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला विषयक कार्य व सामाजिक विकासाच्या दृष्टीने 2011 मध्ये निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
गेल्या 10 वर्षात प्रतिष्ठान ने केलेल्या कार्यामध्ये प्रतिष्ठान तर्फे 24 तास रूग्णवाहिका, गावोगावी स्वच्छ व शुद्ध पाण्याची सोय, पथदिवे, पदरस्ते, नैसर्गिक आपत्ती समयी शेतकरी व पिडीत जनतेला मदत, मोफत वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, युवकांसाठी मोफत व्यायामशाळा व साहित्य, जेष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. तसेच हजारो बेरोजगार तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत व काहींना उद्योजकतेला प्रोत्साहन करून उद्योगासाठी मदत केली आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव व चालना देण्यासाठी विचारपीठ स्थापन केले आहे. शासन दरबारी सर्वसामान्य जनतेची होणारी पिळवणूक लक्षात घेता पारनेर-नगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. निलेशजी लंके यांच्या माध्यमातून मतदार संघात जनता दरबार व आमदार आपल्या दारी सारख्या योजना राबवून जनतेच्या प्रश्नांचे स्वतः निराकरण केले. जनता दरबार व आमदार आपल्या दारी यासारख्या योजनांच्या माध्यमातून कृषी, महसुल, वन, जलसंधारण, पाटबंधारे, विद्युत, आदिवासी सारख्या विषयांवरील समस्या सोडविल्या आहेत.
2020 मधील कोरोना काळातील प्रतिष्ठानच्या वतीने उल्लेखनीय कार्य केले. ज्याची दखल देश पातळीवर घेतली गेली. 2020-21 मधील कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात प्रतिष्ठानच्या वतीने जवळपास 2 लाख 67 हजार लोकांना मोफत जेवण देण्यात आले. त्यासाठी रस्त्याने पायी चालणाऱ्या लोकांसाठी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल लावण्यात आले होते. सुमारे 8 हजार कुटुंबांना जवळपास 96 लाख रुपयांचा किराणा वाटप कोरोना काळात प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. 6 ते 7 हजार लोकांना चप्पल, कपडे, ब्लँकेट, मास्क, सॅनिटायझर चे वाटप प्रतिष्ठानच्या वतीने झाले. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने ‘मा. शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटर’ नावाने 1 हजार बेडचे कोवीड सेंटर तालुक्यातील कर्जुले हर्या गावात उभे केले होते.
पहिल्या टप्प्यात कमी झालेल्या कोरोना रोगाचा प्रार्दुभाव मार्च 2021 पासून वाढत गेला. कोरोना रोगाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर होती. ऑक्सीजन अभावी लोकांचे मृत्यु होत होते तर रूग्णांना उपचारासाठी हॉस्पीटल अपुरे पडत होती. सर्वच स्तरातील लोक हॉस्पीटल मध्ये बेड मिळविण्यासाठी व उपचारासाठी धावपळ करत होती. अशा वेळी आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेऊन पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे 1000 सामान्य बेड व 100 ऑक्सीजन बेड असे एकुण 1100 बेडचे मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोवीड सेंटर सुरू केले. सदर कोवीड सेंटर हे अहमदनगर जिल्ह्यासाठीच नाही तर महाराष्ट्र राज्यातील इतर लोकांसाठी वरदान ठरले. इतर राज्यातुन काही रूग्ण उपचारासाठी दाखल झाले व यशश्वी उपचार घेऊन कोरोनावर मात केली. सदर कोवीड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके यांनी जगाला एक वेगळाच ट्रेड घालून दिला. लोक कोरोना काळात मानसिक दृष्ठ्या ढासळत चालले होते. अशा वेळी कोवीड सेंटर रूग्णांना मानसिक आधार व त्यांचे मनोबल उंचावे यासाठी कोवीड सेंटर मध्ये संगीत संध्या, भजन, किर्तन, हास्य कार्यक्रम, भक्तीगीते, गवळणी, पोवाडा, लोकगीते, जागृती कार्यक्रम, लोककला, आर्केस्ट्रा, समाजप्रबोधन यासारखे कार्यक्रम दररोज आयोजीत केले गेले. त्यामुळे रूग्णांना मानसिक आधार मिळून त्यांचे मनोबल वाढून ते आजारातुन लवकर पुर्णपणे बरे झाले. कोवीड सेंटर अजूनही सुरूच असून अत्तापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण उपचार घेऊन पुर्णपणे बरे झाले आहेत.
याचबरोबर अलोपैथी व होमीपॅथी व्यतिरिक्त नैसर्गिक उपचार पद्धतीने कोरोना रूग्णांवर यशश्वी उपचार करण्यात आले. या देशातील पहिलाच प्रयोग होता. कोवीड सेंटरची व्यवस्था, नियोजन हा विषय सातासमुद्रापार गेला. यामुळे देशभरा सह इतर देशातूनही प्रतिष्ठानला आर्थिक, वस्तु, औषधे, धान्य स्वरूपात सहयोग मिळत गेला. तसेच देशातील व राज्यातील अनेक प्रतिष्ठीत, नेते, मंत्री यांच्यासह सामान्य लोकांनीही कोवीड सेंटरला प्रत्यक्ष भेट दिली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेले कोवीड सेंटर हे देशासाठी मार्गदर्शक ठरले. हे कोवीड सेंटर पाहून राज्यात विविध ठिकाणी कोवीड सेंटर सुरू करण्यात आले.
महत्वाचे अभिप्राय
” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील
” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे
” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “
