Home

रजि.नं.महा/६२८/अ.नगर, दि. २९/०८/२०११ सा.वि.नों.एफ-१५४९०/अ.नगर, दि. १६/०७/२०१२

निलेश लंके प्रतिष्ठान

पारनेर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटूंबातील एका तरूणाने तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाहीला झुगारून तालुक्यात सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रणी भूमिका घेऊन सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांचे हे कार्य पाहून पारनेर तालुक्यातील विविध गावातून काही तरूण मंडळी एकत्र येऊन मा.श्री. निलेश लंके यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली निलेश लंके प्रतिष्ठानची सामाजिक कार्यासाठी स्थापना केली व निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामांना सुरूवात केली.

अधिक जाणून घ्या

फोटो काढण्यासाठी काम करणारा नाही, तर कामाचा पाठपुरावा करून काम मार्गी लावणारा जनतेचा सेवक आहे मी लोकनेते आमदार निलेश लंके

नेते ते लोकनेते...

मा.आ. निलेशजी लंके

पारनेर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटूंबातील एका तरूणाने तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाहीला झुगारून तालुक्यात सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रणी भूमिका घेऊन सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिले. त्यांचे हे कार्य पाहून पारनेर तालुक्यातील विविध गावातून काही तरूण मंडळी एकत्र येऊन मा.श्री. निलेश लंके यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली निलेश लंके प्रतिष्ठानची सामाजिक कार्यासाठी स्थापना केली व निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामांना सुरूवात केली. पारनेर सारख्या डोंगराळ, पठार व पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले तालुक्यातील जनतेचे प्रश्न व समस्या युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारनेर-नगर मतदार संघ व महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी विविध कार्यक्रम व उपाययोजना राबविणे.

आमच्या विषयी

ध्येय व उद्दीष्ठ्ये

संचालक मंडळ

ऑडिट रिपोर्ट

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी झोकून देत आमदार निलेश लंके करत असलेले हे काम राज्याला दिशादर्शक आहे. संकट काळात धावून जाण्याचे ‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल. आमदार लंके यांचे संकट काळातील काम राज्याला दिशादर्शक “

पद्मश्री पोपटराव पवार

पद्मश्री पोपटराव पवार

कार्याध्यक्ष आदर्श गाव

गाव, समाज आणि देशासाठी जगणारी मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. सेवेचा आनंद हा काही वेगळाच असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. मात्र आमदार लंके यांनी उभे केलेल्या कामामुळे ते सेवेतुन मिळणारा आनंद अनुभवत आहेत. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग अपमान पचविण्याची शक्ती या पाच तत्वांवर आमदार लंके यांचा विश्वास असल्याने त्यांच्या कामातून जाणवते “

पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे

पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक

संपर्क

फोन नं.

मुख्य कार्यालय

पहिला मजला, न्यु आर्टस कॉलेज गेट शेजारी, पारनेर-सुपा रोड, पारनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर 414302 (महाराष्ट्र)

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.